Gokul Paryatak Nivas

एकदा अवश्य भेट द्या, पुन्हा पुन्हा याल.....

एकदा अवश्य भेट द्या, पुन्हा पुन्हा याल.....

About us

Welcome to Gokul

A Gokul Paryatak Nivas awaits you in the world of traditional kokani kindness. Forget your worries in this beautiful Hotel comfortable with the beauty and warm kindness will remain memorable. Nestled in the heart of the Kokan, this hotel offers elegantly furnished rooms at once comfortable. Purposefully located 17 km from the Shriwardhan, this hotel incidentally is the ideal place to stay during your holiday trips as it is equipped with all modern amenities you may need. Just a 5 minute walk from Harihareshwar Temple, the jewel of the hotel has a view off Natural Beauty. No hotel symbolizes better than the Gokul Paryatak Nivas greatness and kindness of the historic Place of the Harihareshwar.

Harihareshwar is well known for its white sand beaches and Temples, located in Konkan Coast. Harihareshwar is a town in Raigad district, in Maharashtra, India. It is surrounded by four hills named after lords Harihareshwar, Harshinachal, Bramhadri and Pushpadri. The river Savitri enters the Arabian Sea from the town of Harihareshwar. Towards the north of the town is the temple of Lord Harihareshwar, said to have been blessed by Lord Vishnu. Hence Harihareshwar is often referred to as Dev-ghar or “house of God”.

पालखी उत्सव. कोस प्रदक्षिणा.

हरिहरेश्वर​ दक्षिण काशी

हरिहरेश्वर महाराष्ट्र राज्यामधील रायगड जिह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील अरबी समुद्राच्या बाजूला असलेले “दक्षिण काशी ” म्हणून ओळखले जाणारे हरिहरेश्वर हे कोकणातील अग्रगण्य तीर्थक्षेत्र व पर्यटक केंद्र आहे. मुंबई पुण्यापासून चार तासांचे अंतरावर, दरवर्षी लाखो भाविक या पर्यटक हरिहरेश्वर मंदिर व मंदिरासमोर असणाऱ्या समुद्र किनारा (बीच) ला भेट देत असतात. मुख्य मंदिर हरिहरेश्वर (ब्रम्हा, विष्णू, महेश आणि पार्वती ) असे संयुक्त ठिकाण आहे. तसेच कालभैरव योगेश्वरीचे मंदिर आहे. त्याच प्रमाणे हरिहरेश्वर मंदिरात गणपतीचे स्थान आहे. खूप लोकांचे हरिहरेश्वर हे कुलदैवत आहे. जशी मंदिरात चार स्थाने आहेत त्याप्रमाणे ब्रम्हा, विष्णू, महेश आणि पार्वती असे चार डोंगर सुद्धा आहेत . मंदिरांच्या पाठीमागून परिक्रमा मार्ग आहे. सदरची परिक्रमा समुद्राचे बाजूने आहे. मंदिर व बीच ह्या दोन कारणांसाठी लाखो पर्यटक हरिहरेश्वरला भेट देत असतात. सदरचे चे ठिकाण हे शांत असलेमुळे शांततेत राहण्यारासाठीही काही लोक आवर्जून येत असतात. त्याच बरोबर धार्मिक कार्यासाठी, शांती करणेसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. हरिहरेश्वर मध्ये दरवर्षी अनेक उत्सव साजरे केले जातात तसेच हरिहरेश्वर पासून जवळच्या अंतरावर देखील मंदिर व बीचेस आहेत.

पालखी उत्सव

हा उत्सव कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरी पौर्णिमा असा महिनाभर चालतो, रोज रात्री साधारण ९ ते १० वाजे पर्यंत मंदिर परिसरात पालखी फिरवली जाते, कार्तिक एकादशी च्या दिवशी संपूर्ण गावात पालखी फिरून ब्रम्हा, विष्णू, महेश व पार्वती या चारीही डोंगरांना प्रदक्षिणा मारून पारत मंदिराकडे पालखी येते या प्रदक्षिणेला कोस प्रदक्षिणा म्हणतात. उत्सव अतिश मनमोहक नेत्रदीपक असतो. त्रिपुरी पौर्णिमेला त्रिपुर लागल्यावर उत्सवाची सांगता होते.

कार्तिकी एकादशी यात्रा

साधारण नोव्हेंबर महिन्यात कार्तिकी एकादशी निमित्त यात्रा भरते याच दिवशी पालख्या कोस प्रदक्षिणा मारतात, भरपूर लोक यात्रे निमित्त आपली हजेरी लावतात.

महाशिवरात्री यात्रा​

साधारण फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात महाशिवरात्री निमित्त मोठी यात्रा असते.

त्रिपुरी पौर्णिमा

मंदिर परिसरात असलेले त्रिपुर सदरचे दिवशी रात्री लावले जातात.
याच दिवशी पालखी उत्सवाची सांगता होते

कालभैरव जयंती उत्सव

साधारण नोव्हेंबर महिन्यात उत्सव असतो, तीन दिवस चालणार उत्सव कालभैरव जयंतीचे दिवशी १२.४५ ला उत्सव साजरा केला जातो. तिसऱ्या दिवशी महाप्रसादाने उत्सवाची सांगता होते.